सात-बारा उतार्‍यावरी 9 हजार 287 कालबाहय नोंदी रद्द

अभिनव उपक्रम || नाशिक विभागातील 54 हजार 150 झाल्या कमी
सात-बारा उतार्‍यावरी 9 हजार 287 
कालबाहय नोंदी रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सातबारा उतार्‍यावरील कालबाह्य नोंदी (Expired entries on Satbara) कमी करण्याची नाशिक महसूल विभागात (Nashik Revenue Department) मोहीम राबविण्यात येत आहे. सातबारा (Satbara) उतार्‍यावरील अनाश्यक बोजा, नोंदीमुळे (Record) शेतकर्‍यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज (Agricultural Loan) घेण्यास अडचणी (Problems) येत होत्या. मात्र आता या मोहिमेमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) सात-बारा वरील अशा प्रकारे 9 हजार 287 कालबाहय नोंदी रद्द करण्यात आल्या असून नाशिक विभागातील (Nashik Revenue Department हा आकडा 54 हजार 150 आहे.

शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असलेल्या सात-बारा (SatBara) उतार्‍यांवर गेल्या अनेक वर्षांपासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडींग, सावकारी बोजे आणि नजर गहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्या नोंदी आहेत. जमिनीच्या (Land) सात-बारा उतार्‍यावरील जुन्या सावकारी कर्जांच्या नोंदीमुळे अनेक जटील प्रश्न निर्माण होत होत्या. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी विक्री (Purchase and Sale of Land) करताना आणि संपादीत जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामधून अनेक वाद (Dispute) निर्माण होत होते. ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयापासून अशा प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याची धडक मोहीम घेऊन कालबाहय नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Nashik Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game) यांनी दिले होते.

या मोहिमेविषयी सविस्तर माहिती देतांना गमे म्हणाले की, सात-बारा उतार्‍यावरील कालबाहय नोंदी कमी झाल्यामुळे महसूली अभिलेख परिपूर्ण व दोषविरहीत होऊन शेतकरी व सामान्य नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. राज्यातील ही एक अभिनव मोहीम असून अभिलेखे दोषविरहीत झाल्याने वाद विवाद कमी होतील. नाशिक विभागातील (Nashik Revenue Department) पाचही जिल्ह्यात सात-बारा उतार्‍यांची एकूण संख्या 46 लाख 97 हजार 122 एवढी आहे. यापैकी 75 हजार 999 एवढया सात-बारा उतार्‍यांवरील इतर हक्कात कालबाहय नोंदी होत्या. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात 17 हजार 988, धुळे जिल्ह्यात 6 हजार 478, नंदुरबार जिल्ह्यात 6 हजार 986, जळगाव जिल्ह्यात 32 हजार 55 आणि नगर जिल्हयात 12 हजार 492 कालबाहय नोंदी होत्या.

ऑगस्ट महिन्यापासून सात-बारा उतार्‍यावरील कालबाहय नोंदी कमी करण्याची धडक मोहीम (Campaign to Reduce Outdated Entries) हाती घेतल्यानंतर मागील दोन महिन्यात एकूण 54 हजार 150 कालबाहय नोंदी कमी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 8 हजार 552, धुळे जिल्ह्यात (Dhule District) 4 हजार 798, नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) 6 हजार 4, जळगाव जिल्ह्यात (Jalgav District) 25 हजार 549 तर नगर जिल्हयात (Nagar District) 9 हजार 287 इतक्या कालबाहय नोंदी सात-बारा उतार्‍यावरील इतर हक्कांमधून कमी करण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती ही गमे यांनी दिली.

Related Stories

No stories found.