सारसनगरमध्ये बंद घर फोडले

रोख रक्कम, दागिण्यांसह लाखांचा ऐवज लंपास
सारसनगरमध्ये बंद घर फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर बंद करून देवदर्शनासाठी राजस्थान (Rajasthan) येथे गेलेल्या सारसनगर (Sarsnagar) येथील भंडारी कुटुंबाचे घर अज्ञात चोरट्याने (Thieves) फोडले. या घरफोडीत (Burglary) 80 हजार रूपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा एक लाख पाच हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. पियुष कचरदास भंडारी (रा. औंसकर मळा, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे 8 नोव्हेंबर रोजी कुटुंबासह देवदर्शनासाठी राजस्थान येथे गेले होते. त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली. कपाटाचे लॉक (Cupboard Lock) तोडून 80 हजार रूपयाची रोकड, सोन्याचे दागिणे चोरून नेले. भंडारी कुटुंब रविवारी सकाळी घरी आले तेव्हा घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी कॅम्प पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलीस पथक व स्वान पथकाने (Swan Squad) भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com