राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

ग्रामसभेत निर्णय आल्यानंतर चर्चेत आलेल्या म्हैसगावच्या सरपंचपदाचा फैसला अखेर झाला आहे.

म्हैसगाव येथे झालेल्या ग्रामसंसदेच्या मतदानात 116 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. अखेर सरपंच महेश गागरे यांच्या विरूद्ध ग्रामसभेने कौल देऊन त्यांना सत्तेवरून पायउतार केले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. एकूण 1526 मतपत्रिका वाटण्यात आल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी झाली. सध्या गावात मोठी गर्दी आहे.

एकूण १४७९ पैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने ७५६ मतदान झाले. तर ठरावाच्या विरूद्ध म्हणजेच सरपंच गागरे यांच्या बाजूने ६४० मतदान झाले. ११६ मतांनी अविश्वास ठराव मंजुर झाला. त्यामुळे आता सरपंच गागरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे.

ग्रामसभेत चिठ्ठी पद्धतीने मतदान झाले. आता उपसरपंच सुनील दुधाट यांच्याकडे नवीन सरपंच निवडीपर्यंत पदभार सोपविण्यात आला आहे. यावेळी ८३ मते बाद झाली. नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आल्याने जिल्ह्याचे लक्ष ग्रामसभेकडे वेधले होते. गागरे समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून विरोधी गटाने ग्रामसभेने दिलेल्या कौलाचे स्वागत केले आहे.