
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सारोळा कासार (Sarola Kasar) (ता. नगर) ग्रामपंचायतमधील (Grampanchayat) एक लाख 50 हजार रूपये किंमतीची नवीन ताडपत्री चोरणार्या आरोपीला (Accused) नगर तालुका पोलिसांनी अटक (Nagar Taluka Police Arrested) केली. त्याच्याकडून चोरीची ताडपत्री जप्त (Seized) करण्यात आली आहे. नितीन बाळासाहेब कडुस (वय 34) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या रामनगरी मंगल कार्यालयमधून 21 फेब्रुवारी 2022 रोजी अज्ञात चोरट्याने नवीन प्लास्टिक ताडपत्री चोरली होती. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार नितीन बाळासाहेब कडुस (वय 34) याला ताब्यात घेऊन त्याचेकडून ताडपत्री जप्त केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गव्हाणे, रमेश शिंदे यांनी ही कामगिरी केली.