सराला बेटावर दिपोत्सव
सार्वमत

सराला बेटावर दिपोत्सव

अयोध्या श्रीराम जन्मभूमिवर मंदिर भूमिपुजनानिमित्त

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|astgav

श्रीराम जन्मभूमिवर आयोध्याला श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाच्या पवित्र पार्श्वभुमिवर श्रीक्षेत्र सराला बेटावर महंत रामगिरी महाराज व बेटातील विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत दिपोत्सव साजरा केला.

अयोध्येत हा उत्सव सुरू असताना श्रीक्षेत्र सराला बेटातही उत्सव साजरा करण्यात आला. महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते सराला बेटावर श्रीराम प्रभुंच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सराला बेटाच्या संपूर्ण भक्तपरिवारानेही महंत रामगिरी महाराजांच्या आवाहनानुसार आप आपल्या घरी दिपोत्सव साजरा केला.

सराला बेटावर रांगोळ्याची पखरण, दिव्यांनी बेटावरील मंदिर परिसर लख्ख झाला होता. हेच अनुकरण भक्तपरिवारानेही केले. यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले, सर्वच धर्मिय रामाला मानतात. 500 वर्षांचा संघर्ष होता. या संघर्षात हजारो लोक, साधू यांनी बलिदान दिले. इतक्या वर्षात मंदिर झाले नाही हे दुदैव, हा आता अमृतयोग होता, कितीतरी पिढ्यांपर्यंत हा योग आलेला नव्हता. तो योग आपल्याला आला.

हा आनंद आपण आपल्या भक्तपरिवाराला सांगितल्याने या दिवशी सकाळी सडा टाकून आणि रांगोळी काढली, सकाळी 10 वाजता श्रीरामाचे पूजन केले. सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरात पूजन केले. ज्या ठिकाणी मंदिर नाही तेथे घरीच प्रतिमेचे पूजन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com