
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
एखाद्या परिसराचा विकास करावयाचा असेल तर त्या परिसरातील लोकप्रतिनिधीला विकास कामासाठी निधी कोठून आणायचा, कसा आणायचा याबाबतची माहिती आवश्यक असते. लोकप्रतिनिधी जागृत असेल तरच त्या भागाचा झपाट्याने विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन पंचायत राज विषयातले तज्ज्ञ, निवडणुकीचे तंत्र-मंत्र आणि शास्त्र याचे जाणकार सारंग कामतेकर यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकप्रतिनिधींचे हक्क, कर्तव्ये आणि जबाबदारी’ या विषयावर शहरातील मालपाणी लॉन्स येथे संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे होते. याप्रसंगी व्यासपीठावर संगमनेर पत्रकार मंचाचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, प्रकल्प प्रमुख श्याम तिवारी, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे आदी उपस्थित होते.