सराला गोवर्धन, वांजरगाव परीसरात मुसळधार पाऊस

सराला गोवर्धन, वांजरगाव परीसरात मुसळधार पाऊस

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच वैजापूर तालुक्यातील वांजरगाव या परिसरात काल सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

सायंकाळी साधारण साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होत मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने पावसाच्या प्रमाणात कमी जास्त वाढ होत होती. या पावसाने शेतातील नांगरटीमध्ये पाणी साचले आहे. काही शेतकर्‍यांची शेतातील पेरणी पूर्व मशागत झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधुन-मधून ढगांचा गडगडाट होऊन जोरदार आवाज होत होता. सराला येथे रस्त्यावर पाणी आल्याचे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सामाजीक कार्यकर्त्यांनी मदत कार्य करत नागरिकांना सहकार्य केले. या पावसाने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com