सराफांना नकोय ‘एचयूआयडी’

सराफांना नकोय ‘एचयूआयडी’

जाचक अटींविरोधात लाक्षणिक बंद । उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉलमार्कींगमधील (Hallmarking) जाचक एचयूआयडी प्रक्रिया (HUID Process) रद्द करावी (Canceled Demand) या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने (Maharashtra State Saraf Suvarnakar Federation) पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक बंदला (One Day Close) नगर जिल्ह्यातील सर्व सराफ व्यावसायिकांनी (Goldsmiths) पाठिंबा दिला असून सोमवारी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांना (Deputy Collector) दिले.

यावेळी अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुथा, अखिल भारतीय लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, सराफ सुवर्णकार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, प्रमोद बुर्‍हाडे, मुकुंद रत्नापूरकर, अमित कोठारी, प्रकाश हिंगणगावकर, अमित पोखरणा, संजय शिंगवी, नितीन शिंगवी, अतुल बोरा, राहुल देडगावकर, दिनेश देशमुख, सुनील डहाळे, संतोष देडगावकर, ईश्वर बोरा, मयूर कुलथे, शुभम मिरांडे, अमोल देडगावकर, बंटी देवळालीकर, रसिक कटारिया, सुरेश मुथा, दिलीप मुथा, विनित मुथा आदी उपस्थित होते.

ज्वेलरी उद्योगाच्या संस्थांबरोबर चर्चा न करता भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) (BIS) दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल केला व एचयूआयडीद्वारे (HUID) तपासणीची व असंविधानिक पद्धत आणली. ही प्रणाली सराफ व्यवसायिकांसाठी अव्यवहारिक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.

केंद्र सरकारने (Central Government) देशातील 741 जिल्ह्यांपैकी 256 जिल्ह्यात 16 जून 2021 पासून 16 जूनपासून रत्न आणि दागिने उद्योगावर अनिवार्य हॉलमार्किंग (Mandatory Hallmarking) लागू केले आहे.यामध्ये भारतीय मानक ब्यूरो (बीएसआय) ने शुद्धतेचे चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करताना बीएसआय लोगो, कॅरेट शुद्धता, हॉलमार्क सेंटर व ज्वेलर्सच्या दुकानाचा लोगो टाकण्यात करण्यात येत होते.

त्यामुळे ग्राहकांबरोबर दागिन्यांची खरेदीविक्री करताना अडचण येत नव्हती. मात्र, केंद्र सरकारने ज्वेलरी इंडस्ट्रीजच्या शिखर संस्थेबरोबर चर्चा न करता चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करून एचयूआयडीद्वारे (HUID) तपासणीची असंविधानिक पद्धत आणली. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांवरील सराफी व्यवसायिकाच्या दुकानाचा लोगोच (Shop Logo) काढून टाकला.

यामध्ये सहा आकडी क्रमांक, सुरक्षितता नाही. हॉलमार्किंग (Hallmarking) केल्यानंतर त्याची नोंद, ग्राहकाचे नाव व मोबाईल दागिन्यांमध्ये कोणताही बदल करता क्रमांक सहित बीएसआयच्या (BSI) पोर्टलवर कायमस्वरुपी राहणार आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्पारी यांच्या गोपनीयतेमध्ये बाधा येणार आहे. तसेच सोन्यांच्या दागिन्यांच्या खरेदी बरोबरच वैयक्तिक माहिती व व्यवसायामध्ये सरकारचा सराफ हस्तक्षेप होत आहे. देशात हॉलमार्किंग ‘केंद्रां’च्या कमतरतेमुळे भारतभर हॉलमार्किंगची अंमलबजावणी अशक्य आहे. यामुळे संपूर्ण उद्योग आणि मूल्य साखळी विस्कळीत होईल आणि लाखो लोकांचे जीवनमान धोक्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी म्हटले आहे.

‘इन्स्पेक्टर राजच्या भितीने व्यवसाय बंद पडतील’

केंद्र सरकारने हॉलमार्क कायद्यामध्ये एचयूआयडी (हॉलमार्किंग युनिक आयडी) प्रणालीचा समावेश केल्याने येणार्‍या काळात सराफ व्यावसायिकांची व्यवहारात काही चूक झाल्यास गुन्हेगारी स्वरुपाचे केसेस दाखल होतील. त्यामुळे इन्स्पेक्टर राजच्या भितीने व्यवसाय बंद करावे लागतील. दुकानात व्यवहार करणे कठीण जाणार असून, येणार्‍या काळात ही प्रणाली म्हणजे विष आहे. त्यासाठी या जाचक निर्णयाविरोधात राज्यातील सर्व सुवर्णकार सराफ बांधवांचा पाठिंबा असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या मार्गदर्शनानूसार नगर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी एकदिवसीय लाक्षणिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आमच्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. सराफव्यावसायिकांच्या भावना निती आयोग आणि केंद्र सरकारपर्यंत पोहचविणार असून सराफव्यावसायिकांना न्याय देवू, असे आश्वासन उपजिल्हाधिर्‍यांनी दिले आहे.

- सुभाष मुथा अध्यक्ष, अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com