सानुग्रह अनुदानातून रक्कम कपातीला विरोध

मनपा कर्मचारी कृती समितीचे आयुक्तांना निवेदन
सानुग्रह अनुदानातून रक्कम कपातीला विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येक कर्मचार्याला 10 हजार सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन मात्र सानुग्रह अनुदानाच्या रक्कमेतून कपातीला महानगरपालिका कर्मचारी कृती समितीने विरोध दर्शविला आहे.

सानुग्रह अनुदानाच्या संपूर्ण रकमा कर्मचार्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन समितीच्यावतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, भगवान जगताप, कृती समितीचे अध्यक्ष सुरेश उमाप, उपाध्यक्ष लखन गाडे, सचिव संजय साठे, शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे, मनोज औशीकर, शरद भालेराव, पांडुरंग घोरपडे, अनिकेत साठे, संदीप पठारे, शुभम भोसले, याकोब वडागळे, किरण घोरपडे, संजय साठे, उमाप, संदिप पठारे, राजू अवघडे, काशिनाथ मोहिते, संदिप वैराळ आदी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी विठ्ठल उमाप, संदीप पठारे, गणेश मोहिते, शुभम भोसले, गोरख भालेराव, अजय सौदे यांनी महापालिका प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला यश आले असून महापालिका कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार असल्याने या निर्णयाबद्दल महापौर व आयुक्तांचे समितीच्यावतीने आभार मानण्यात आले आहे. तर कामगार कायद्यानुसार कायदेशीर कपाती व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशी मागणी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com