‘संत कदम माऊली’च्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान जागा

‘संत कदम माऊली’च्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान जागा

आरडगाव / वळण |वार्ताहर| Aradgav

मुळा डाव्या कालव्यावरील 28 पाणीवापर संस्थांपैकी संत कदम माऊली पाणीवापर संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकर्‍यांनी दोन्ही मंडळाला समसमान संधी दिली. त्यामुळे दोनही मंडळाला विजयाचा गुलाल घेता आला नाही.

पाथरे (ता.राहुरी) येथील संत कदम माऊली पाणीवापर संस्थेच्या 12 संचालक मंडळाच्या जागांकरीता 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी जी.बी.नान्नोर यांनी निकाल घोषित केला. यामध्ये जनसेवा मंडळाला सहा आणि विरोधी परिवर्तन विकास मंडळाला सहा अशा समसमान जागा मिळाल्या. बाबासाहेब टेकाळे 82, रखमाजी जाधव 85, सुभाष टेकाळे 77, संगीता जाधव 87, काशिनाथ जाधव 83, मयूर जाधव 93, संकेत जाधव 95, सिंधुबाई पवार 86, दौलत जाधव 100, भास्कर गावडे 99, शंकर जाधव 110, विठाबाई जाधव 105 आदी उमेद्वार विजयी घोषित करण्यात आले.

17 वर्षापासून रखमाजी जाधव, शंकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था बिनविरोध होत होती. मात्र यावर्षी रणछोडदास जाधव, नारायण टेकाळे, रंगनाथ जाधव, शिवाजी जाधव, नारायण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही नवीन तरुणांना बिनविरोध संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र सत्ताधारी केवळ चार संचालक बिनविरोध देण्यावर ठाम होते. त्यामुळे विरोधी परिवर्तन विकास मंडळाने स्वतंत्र मंडळ स्थापन करून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये केवळ दोन-चार, दहा-वीस मतांच्या फरकाने विरोधी शेतकरी परिवर्तन मंडळाच्या काही उमेदवारांचा पराभव झाला. तरी देखील शेतकर्‍यांनी दोन्ही मंडळाच्या समसमान सहा जागा निवडून दिल्या. त्यामुळे आता आगामी काळात चेअरमनपदासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com