
नेवासा |शहर प्रतिनिधी|Newasa
नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते 365 दिवस वाहतुकीसाठी खुले राहतील. त्यावर अतिक्रमणे होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन नगरपंचायत प्रशासनाने दिल्यानंतर नेवासा येथील नगरपंचायत चौकात मंगळवारी सकाळी सुरु करण्यात आलेले चक्री उपोषण मागे घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारे मुख्य रस्ते वाहतुकीस कायमस्वरुपी मोकळे करावे या मागणीवर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने दिलेल्या इशार्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह समर्पण फाउंडेशन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळ व नागरिक यांनी नगरपंचायत चौकात सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन व चक्रीउषोषण सुरु करण्यात आले.
या आंदोलनास उद्धव महाराज मंडलिक, समर्पण फाउंडेशनचे करण घुले, ज्ञानेश्वर शिंदे, अमृत फिरोदिया, संतोष पडुरे, शांताराम गायके, बालेंद्र पोतदार, कृष्णा डहाळे, संभाजी ठाणगे, अनिल ताके, जानकिराम डौले, माजी नगरसेवक काकासाहेब गायके, मुरलीधर कराळे, अनिल बोरकर, भाऊसाहेब वाघ, रुपेश उपाध्ये सतिष गायके, अंबादास लष्करे, योगेश काळे, बाळासाहेब शिंदे, अजय शिंदे, बाळासाहेब पवार, विकास काकडे, मच्छिंद्र कडू, महेश मापारी, सागर देशमुख, बाळासाहेब तनपुरे, राजेंद्र कडू, भगवान सानप, डॉ. जालिंदर गोरे, संजय राशींनकर, विजय कावरे, अजित नरुला, अंकुश काळे, श्रीपाद दारुटे, विठ्ठल मैदाड, पोपट शिंगी, मोहन पडूंरे, बाबुराव ढवळे, अशोक लोखंडे, राजेंद्र शेजूळ, सुनील परदेशी, शाम पठाडे, अनिल लोखंडे, अशोक गायके, सचिन नागपूरे, गंगाधर मगर, चंद्रकांत घोडके, संदीप ताठे, शिवाजी गायकवाड, संदीप आलवणे, आण्णासाहेब पेचे, भानुदास रेडे, लक्ष्मीनारायण महाराज, पांडुरंग मते, ज्ञानेश्वर काळे, मिलिंद नागे, दीपक धनगे, अशिष कावरे, डॉ. विलास राऊत, अॅड. बी. एस, शिरसाट, अॅड. बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गरड, संतोष काळे, गणेश मोरे, शुभम उपाध्ये, अनिकेत ढोकणे, संदेश शिंगी, अमोल शिर्के, विष्णुपंत औटी, डॉ. विलास राऊत, राजेंद्र सुकाळकर, संदीप आलवणे, विलास गरुड, रामभाऊ केंदळे, अशोक चौधरी आदींनी उषोषणस पाठींबा दिला.
दुपारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे, मुख्याधिकारी अंबादास गर्कल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश दुबाले यांनी शिवाजी महाराज देशमुख व नागरीकांशी चर्चा करुन रस्त्यामधील अतिक्रमणच्या जागेवर दुभाजक बसवण्याचे काम त्वरित सुरु करण्याचे ठरले. त्याप्रमाणे काम सुरु झाले. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने उपोषणार्थींना हमरस्त्यावर नेवासा खुपटी-पानेगाव प्रजिमा-27 या रस्त्याच्या हद्दीतील रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटरच्या आत असणारे रस्त्यावरील अडथळे, बांधकाम येत्या आठ दिवसात काढून रस्ता पूर्णपणे वाहतुकीस मोकळा करून देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग नेवासा हे पूर्ण करतील. फेरीवाले, फळ विक्रेते हे हातगाडीवर व टोपली मांडून रस्त्यामध्ये बसणार नाहीत. यासाठी सा. बां. विभाग उपविभाग नेवासा व नगरपंचायत समन्वयाने संयुक्तपणे कारवाई करील.
मागणीनुसार सदर रस्ता हा 365 दिवस वाहतुकीसाठी खुला राहिल यावर अतिक्रमणे होणार नाही. याची जबाबदारी सा. बां. विभाग उपविभाग नेवासा यांची असून सदर रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास आम्ही कायदेशीर फौजदारी गुन्हे तातडीने दाखल करू. कायमस्वरूपी रस्त्यामध्ये रस्ता दुभाजक व रस्त्याच्या दुतर्फा तत्सम अनुषंगिक सुविधेकरिता प्रस्ताव सा.बां. विभागाकडून वरिष्ठ पातळीवर पाठवून मंजूर करून घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. सा.बां. विभागाकडून श्रीरामपूर रोड प्रवरा पुलापासून ते मार्केट कमिटीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हत्तीतील रस्त्यामधील अतिक्रमणे/अडथळे दूर करून रस्ता वाहतुकी सुरळीत करू व पार्किंगचे पट्टे व झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे करून घेण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर चक्रीउषोषण स्थगित करण्यात आले. शिवाजी महाराज देशमुख यांनी अधिकारी, भक्त मंडळ व नागरीकांचे आभार मानले.