यावर्षी कुमारी मुला- मुलींना अन् वाघांना त्रास होणार !

यावर्षी कुमारी मुला- मुलींना अन् वाघांना त्रास होणार !

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

यंदाची संक्रांत कुमारी असून तीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून वाघावर मांडी घालून बसलेली असल्याने यावर्षी कुमारी मुला मुलींना अन् वाघांना त्रास होणार असल्याचे ग्रामीण भागात पंचांग हातात घेऊन घरोघर संक्रांत सांगताना " भटजीबुवा " हे भाकीत सांगताहेत.

ओम नमः शिवाय शके १९४३ पौष १३ तारखेला एकादशीस भोगी तर व्दादशीस १४ तारखेला संक्रांत असून यावर्षीची कुमारी संक्रांत असून पिवळे वस्त्र परिधान वाघावर बसून ऊप वाहन घोडा आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत आहे. अंगावर मोत्यांचे दागिने आहेत परंतु पिवळे वस्त्र असल्याने सोने भावात घसरण, ऊपवाहन घोडा असल्याने न जमणारे विवाह जमून येतील. मात्र कुमार मुला मुलींना सावध रहावे लागेल त्रास संभवतो, वाघास शिकाऱ्यापासून त्रास आहे.

संक्रांत खिर खात असल्याने तांदूळ तुप ,यांसह द्रवरूप पदार्थांसह सोयाबीनचे भाव वाढणार आहे. संक्रांत खाली बैठक मारून बसल्याने वाणी शेठजीना पीडा संभवते.

सुर्य दुपारी तीन नंतर मकर राशीत जाणार असल्याने सुवासिनी महिलांनी दुपारी तीन नंतर पूजा करावी. असे संक्रांत वाचनात गावोगावी ब्राम्हण भटजी बुवांनी महिला समोर वाचन केल्याने सुशिक्षित महिला पारंपरिक श्रध्दा म्हणून ऐकतात, तर अशिक्षित ज्येष्ठ महिला पालन करतात. पंचांग पाहून भटजीबुवा परंपरा चालवितात यात दोष कुणाचाच नाही संक्रांत ऐकल्यावर सुशिक्षित महिला आपसात चर्चा करत असल्याचे दिसून आले.

यावर्षीची अतिवृष्टी अन् बिगरमोसमी, गारपीटीने शेतकऱ्यांकडेच वनोळा नाही. शहरी नातेवाईक, मित्र परिवाराला शेतात पिकणारे हरबरा, गहू, ज्वारी हुरडा, बोरे या वाणाचा संक्रांतीला वानोळा देणाऱ्या बळीराजाला यावर्षी या सर्व वाणासाठी भटकंती करून बाजारात धाव घ्यावी लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com