संजीवनीला बेस्ट एनर्जी इफिसिएंट संस्था पुरस्कार
सार्वमत

संजीवनीला बेस्ट एनर्जी इफिसिएंट संस्था पुरस्कार

भारतातून संजीवनी शैक्षणिक संस्था ठरली पुरस्काराची एकमेव मानकरी-अमित कोल्हे

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

उद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या व 1895 पासुन कार्यरत असलेल्या कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेने नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल कॉम्पीटिशन 2020 या स्पर्धे अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला उर्जा क्षेत्रात नियोजन बध्द व कार्यक्षम वापराबध्दल बेस्ट एनर्जी इफिसिएंट ऑर्गनायझेशन हा पुरस्कार देवुन देश पातळीवरील प्रथम रनर अप या रॅन्कने गौरविले.

ही स्पर्धा विशेष करून उर्जा क्षेत्रात कार्यक्षमरित्या कामगिरी करत असलेल्या उद्योगांसाठी अली तरी संजीवनी ही शैक्षणिक संस्था असून देखील उर्जा क्षेत्रात आपली भरीव कामगिरी सिध्द केली आणि भारतातील नामांकित कंपन्यामधुनही मुसंडी मारून पुरस्कार प्राप्त केला अशी माहिती इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

श्री.कोल्हे यांनी सांगितले, नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल कॉम्पीटिशन 2020 अंतर्गत देशातील स्मॉल स्केल एन्टरप्रायझेसच्या वर्गवारीतुन संजीवनीसह 25 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उर्जा क्षेत्राशी निगडीत अपारंपारीक उर्जा, पारंपारिक उर्जेतून होणारे प्रदुषण थांबविण्यासाठीच्या उपाययोजना, इतर प्रकारच्या उर्जांचे संवर्धन आणि वापर अशा अनेक बाबींवर पुराव्यासह सादरीकरण करायचे होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मधील डीन, आर अँड डी चे प्रमुख डॉ. आर. ए. कापगते यांनी सिसको वेबेक्स द्वारे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये उर्जेशी निगडीत प्रत्यक्षात वापरत असलेल्या विविध उपक्रमांविषयी सादरीकरण केले.

संजीवनीमध्ये उभारलेल्या 500 किलोवॅटचा सोलर वीज प्रकल्प, त्यामुळे वर्षभरात टळणारे विषारी वायुंचे उत्सर्जन, अनेक कारणांवरून हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यावर प्रतिकार म्हणून हवेत ऑक्सिजन सोडण्यासाठी कॅम्पसमध्ये झाडी लावुन त्यांचे संवर्धन व दरवर्षी नवीन वृक्षांची लागवड, सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठीचा प्लॅन्ट व त्या पाण्याचा वृक्षांसाठी पुनरवापर, मेस व कॅन्टीन मधिल वेस्ट फुडचा व झाडपाल्यांपासुनचे खत व त्याचे वृक्षांसाठी वापर, सभोवलताच्या परींसरांमधुन विद्यार्थ्यांनी वैयक्तिक वाहनांवर येण्याऐवजी त्यांना बसेसची सोय करणे व त्यामुळे वाचलेले विषारी वायु उत्सर्जन, कॅम्पस व सभोवतालच्या कामांसाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करणे, इत्यादी बाबींची माहिती देण्यात आली.

संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या पुढाकाराने वेगवेगळया रस्त्यांच्या कडेला झाडी लावुन त्यांचे संगोपन केले आहे. या सर्व बाबींची दखल घेवुन सीआयआय ने घेतलेल्या नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल कॉम्पीटिशन 2020 या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला प्रथम रनर अप चा पुरस्कार दिला. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे व कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com