संजीवनी पॉलिटेक्निकचा क्रीश शहा जिल्ह्यात प्रथम

राज्य तंत्र शिक्षण मंडळ निकालात संजीवनीचा उत्कृष्ट निकाल
संजीवनी पॉलिटेक्निकचा क्रीश शहा जिल्ह्यात प्रथम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने नुकतेच निकाल जाहीर केले. यात संजीवनी केबीपी पॉलीटेक्निकच्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील क्रीश अमित शहा याने अंतिम वर्षात 96.40 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच सर्वच विद्या शाखांमधील प्रथम ते तृतिय वर्षाचे सर्वच निकाल उत्कृष्ट लागले. संजीवनी पॉलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोविड प्रकोपानंतर एमएसबीटीईने सम सत्रांच्या प्रथमच ऑफलाईन परीक्षा घेतल्या. यात संजीवनी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत शैक्षणिक बाबतीत अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. सम व विषम सत्रांच्या एकत्रित वार्षिक निकालात तृतीय वर्षाच्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागात क्रीश शाहने केवळ संजीवनीमध्येच नव्हे तर जिल्ह्यातील सुमारे 17 पॉलीटेक्निकमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आपल्या प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित संजीवनीमधील शिक्षण पध्दती उत्कृष्ट असल्याचे शिक्कामोर्तब केले.

याच विभागात तिसर्‍या वर्षात प्रतिक्षा पटारे 95.94 टक्के द्वितीय तर सुयश गाढवे 95.09 टक्के तिसरा आला. मेकॅट्रॉनिक्स विभागात सिध्दार्थ गायधने 95.56 टक्के प्रथम, निकीता गंडे 95.26 टक्के द्वितीय, प्रेम गायकवाड 95.04 टक्के तृतीय, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्रज्वल वाणी 93.64 टक्के प्रथम, सुरेश कर्जुले व संध्या म्हैस 91.79 टक्के द्वितीय, स्नेहल वहाडणे 88.82 टक्के गुण मिळवून तृतीय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात दिव्या तांबे 92.44 टक्के प्रथम, वेदांत पाटील 90.11 टक्के द्वितीय तर निखिल मांडोले 90 टक्के तृतीय, सिव्हिल इंजिनिअरींग विभागात संकेत नळे 87.63 टक्के प्रथम, मयुर पवार व तेजस दारूंटे 86.79 व 86.11 टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

द्वितीय व प्रथम वर्षाचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. द्वीतिय वर्ष- कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग-प्रतिक्षा चांदर (94), समृध्दी बोरावकेे (90.53), अक्षदा फोपसे (89.93), मेकॅट्रॉनिक्स विभाग-यशश्री चौधरी (92.38), जागृती शेळके (89.62), रितेश औताडे (89.41), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग-चैतन्य खरात (81.22), विनय संवत्सरकर (80.70), हर्षदा पवार (80.64), सिव्हिल इंजिनिअरींग विभाग-सुहानी सोमासे (83.76), श्रेया कुलकर्णी (81.88), अनुजा सांगळे (79. 88), मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग- मंगेश लव्हाळे (84.86), राजा कुमार (83.66), पुर्वा अनिल भोंगळे (81.89).

प्रथम वर्ष कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग-संस्कृती पाटील (94.13), प्राजक्ता औताडे (91.25), गौरी लंके (90.88), मेकॅट्रॉनिक्स विभाग-अथर्व वाघमारे (89.10), आकांशा नागपुरे (87.79), मयुरी वावळे (87.52), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग- सिध्दी वाकचौरे (89.73), लीना भोई (84.20), शुभम कातकडे (83.93), सिव्हिल इंजिनिअरींग विभाग-परूण चौधरी (92.06), हर्षल परजणे (91.87), अक्षय औताडे (75.93), मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग-भावी चौहान (85.59), संजना चांदर (84.90), पद्मश्री बोळीज (83.59). तृतीय वर्षातील पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा श्री अमित कोल्हे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. मोहिनी गुंजाळ उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com