संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा धावली आपदग्रस्तांच्या मदतीला

ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये साचलेले पाणी काढले बाहेर
संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा धावली आपदग्रस्तांच्या मदतीला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांचे आणि व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. संकटसमयी युवा नेते विवेक कोल्हे यांनी नागरिकांच्या मदतीला धावून जात सामाजिक बांधिलकी जोपासली.

कोपरगाव शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. शेकडो घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढे मोठे संकट कोसळले असताना नागरिकांनी कळवूनही नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या मदतीला धावून आले नाही. युवा नेते विवेक कोल्हे यांना शहरातील ही परिस्थिती माहीत होताच त्यांनी संजीवनी उद्योग समूह आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती निवारण पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल होत अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत करून दिलासा दिला.

टाकळी रोडवरील ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या व्यापारी संकुलात असलेली साई साक्षी मोबाईल शॉपी, श्री साईनाथ लॉड्री, साई शीतल लॉड्री, गुडलक सलून, संतोष आर्टस आदी दुकाने पाण्याखाली गेली होती. या दुकानांमध्ये कंबरेइतके पाणी साचल्यामुळे व्यापार्‍यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. येथील व्यापार्‍यांनी वारंवार सांगूनही नगरपालिका प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही. उलट विवेक कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा या व्यापार्‍यांच्या मदतीला धावून आली.

मंगळवारी सकाळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आणि माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या यंत्रणेला पाचरण करून ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये तात्काळ धाव घेऊन अडचणीत सापडलेल्या व्यापार्‍यांची मदत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com