<p><strong>अहमदनगर|Ahmedagar</strong></p><p>श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संजय सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.</p>.<p>स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांची नगर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली असून तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकरसिंह रजपूत यांची बदली पारनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर जामखेड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकपदी राजू थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदलीबाबतचे आदेश काढले आहेत.</p>