गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी संजय बेलसरे यांची नियुक्ती

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी संजय बेलसरे यांची नियुक्ती

नेवासा | तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

बेलसरे हे सध्या नाशिक येथे जलसंपदा विभागात मुख्य अभियंतापदी कार्यरत आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी हे मागील महिन्यात सेवानिवृत्त झाले. यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राजकुमार शहा यांची नेमणूक करण्यात आली होती.

मात्र, त्यांची मुंबईत जलसंपदा विभागात सचिवपदी नेमणूक झाल्याने हे पद महिनाभरात रिक्त झाले होते.त्यामुळे संजय बेलसरे यांचे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असून त्यांनी २ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील पदभार स्वीकारला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com