सर्वाधिक कर भरूनही स्वच्छता सुविधांचा अभाव

सफाई कामगारांची संख्या वाढविण्यासाठी सावेडीकर आक्रमक
सर्वाधिक कर भरूनही स्वच्छता सुविधांचा अभाव
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरांचा वाढता विस्तार, दिवसेंदिवस नवीन वसाहतींसह, अपार्टमेंट, ट्वीन बंगले, व्यावसायिक गाळे, छोटे-मोठे उद्योग व लोकसंख्या वाढली, त्याप्रमाणात मनपाला सावेडीकरांना सर्वात जास्त कर भरुनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. सावेडी प्रभाग समितीच्यावतीने नगरसेवकांनी मनपाचे उपमहापौर गणेश भोसले यांची भेट घेऊन चर्चा करून सफाई कामगार वाढवून मिळणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.

या निवेदनावर नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनील त्र्यंबके, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, दिपालीताई बारस्कर, शोभाताई बोरकर आदींच्या सह्या आहेत. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात सफाई कामगार उपलब्ध नसल्याने सावेडी परिसरात संपूर्ण भागात स्वच्छता होत नाही. परिणामी मोकळ्या जागांवर, रस्त्यांवर कचरा मोठ्या प्रमाणात साचतो. सावेडी मधील उपनगरातील नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरतात. सर्वात जास्त कर सावेडी विभागामधून प्राप्त होतो. तरीही त्याप्रमाणात सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिक स्वच्छतेबाबत आमच्याकडे तक्रारी करतात.

सफाई कामगार कमी असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब निवेदन देतांना नगरसेवकांनी उपमहापौर गणेश भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, सचिन बारस्कर, अजिंक्य बोरकर उपस्थित होते. सावेडी प्रभाग समितीच्या या निवेदनावर उपमहापौर भोसले यांनी सकारात्मक चर्चा केली. तातडीने ज्या भागात स्वच्छता होत नाही, सफाई कामगार उपलब्ध नाहीत, त्याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन नगरसेवकांना दिले, असे निखिल वारे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com