संगमनेर : 23 गावांमधील तरुणांच्या व्यायाम साहित्यासाठी 2 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर

संगमनेर : 23 गावांमधील तरुणांच्या व्यायाम साहित्यासाठी 2 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

सहकार, समाजकारण, शिक्षण, आर्थिक संपन्नता, सांस्कृतिक वातावरण आणि ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अग्रगण्य असणार्‍या संगमनेर तालुक्यातील 23 गावांमधील युवकांना व्यायाम साहित्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2 कोटी 56 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सर्व गावांमधील विकासाकरिता सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. शंभर किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण असलेल्या या तालुक्यात अनेक 171 गावे व 273 वाड्या-वस्त्या आहेत. तालुक्यातील तरुणांना चांगले शिक्षण व करिअरच्या दृष्टीने नामदार थोरात यांनी विविध सुविधा निर्माण करून दिल्या आहेत.

याचबरोबर आरोग्याच्यादृष्टीने तरुणांसाठी जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने व्यायाम साहित्यासाठी फिजिकल फिटनेस विथ रिक्रिएशन या संकल्पनेवर आधारित योजनेतून 2 कोटी 56 हजार रुपयांचा निधी मिळवला आहे. या अंतर्गत अंभोरे, आश्वी बुद्रुक, कासारा दुमाला, गुंजाळवाडी, घुलेवाडी, जवळेकडलग, जोर्वे, तळेगाव दिघे, धांदरफळ बुद्रुक, निमगाव बु, वडगाव पान, साकूर, सुकेवाडी, संगमनेर शहरातील तिवारी मळा, नाशिक रोड, संजीवन सोसायटी, पीएसपी मालदाड रोड, मेहर मळा, गुंजाळ आखाडा, कुरण रोड, पंचायत समिती रोड, पटेल सॉ मिल, कासट मळा, अकोले रोड, कवी अनंत फंदी नाट्यग्रह या विविध ठिकाणी व्यायामाचे विविध साहित्य देण्यात येणार आहे. यामुळे तरुणांना व्यायामाची चांगली सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत दिशादर्शक पाऊल टाकले गेले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com