घरातून कचरा टाकायला बाहेर पडली तर दुपारी 'ती'चा मृतदेहच सापडला

घरातून कचरा टाकायला बाहेर पडली तर दुपारी 'ती'चा मृतदेहच सापडला

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून शहरातील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील नवीन नगररोड परिसरात राहणारी रोहिणी काळे (वय 56) ही महिला सकाळी घराच्या बाहेर पडली होती. घरातील कचरा टाकण्याचे निमित्त करून सदर महिला घराच्या बाहेर गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पुलाखाली तिचा मृतदेह आढळला.

याबाबत पोलिसांना माहिती समजतात पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी सदर महिलेला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करीत आहे. सदर महिलेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com