संगमनेरमध्ये विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी

100 पैकी 4 पॉझिटीव्ह
संगमनेरमध्ये विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. काल सोमवारी संगमनेरातील बसस्थानकासमोर पोलिसांनी विनाकारण फिरणार्‍या 100 व्यक्तींची चाचणी केली. त्यामध्ये 4 व्यक्ती करोना बाधीत आढळून आले आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात यावी, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार काल संगमनेर बस स्थानकासमोर पोलिस प्रशासनाने मोटारसायकलवर विनाकारण फिरणार्‍यांना थांबवत त्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी केली. दिवसभरात 100 नागरीकांची चाचणी करण्यात आली.

त्यामध्ये 4 जण करोनाबाधीत आढळून आले. त्यांची रवानगी करोना केअर रुग्णालयात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तहसिलदार अमोल निकम हे उपस्थित होते.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने दैनंदिन 100 व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी घेण्यात येत आहे. यामुळे करोना बाधीत रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकतील, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com