दशक्रियाविधीचा फलक लावण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

महिला जखमी, परस्परविरोधी फिर्यादी
दशक्रियाविधीचा फलक लावण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

दशक्रियाविधीचा फलक रस्त्यावर लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरातील घडली. या हाणामारीत एक महिला जखमी झाली. याबाबत 25 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकोले नाका परिसरातील दोन कुटुंबांमध्ये जुनाच वाद आहे. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. याबाबत पहिली फिर्याद योगेश मनोहर सूर्यवंशी (रा. अकोले नाका) यांनी दिली रस्त्याच्या कडेला आजीच्या दशक्रिया विधी संदर्भात फलक लावत होतो. याचा राग आल्याने काही जणांनी हातामध्ये काठ्या, लोखंडी पाईप व लोखंडी काठी घेऊन आपले आई-वडील व भावाला शिवीगाळ करून मारहाण केली. घरावर दगड फेकून मोटरसायकलचे नुकसान केले.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अतुल मेघनाथ सूर्यवंशी, सिद्धार्थ संपत सूर्यवंशी, परिगा सहादू सूर्यवंशी, आकाश दिनकर माळी, मयूर दिनकर माळी, मेघनाथ सहादू सूर्यवंशी, विघ्नेश मेघनाथ सूर्यवंशी, संपत सहादू सूर्यवंशी, उज्वला संपत सूर्यवंशी, मथुरा सहादू सूर्यवंशी, पुनम नवनाथ माळी, आदित्य संपत सूर्यवंशी, मीना गणेश माळी, रूपा दिनकर माळी, अनिता दिनकर माळी व गणेश दशरथ माळी सर्व राहणार अकोले नाका, संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 224/2021 भारतीय दंड संहिता कलम 452, 143, 144, 147, 148, 337, 427, 323, 504, 506, आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शेख करत आहे.

यानंतर काही वेळातच दुसरी फिर्याद परिघा सहादू सूर्यवंशी (वय 40 रा. एकलव्य नगर, अकोले नाका) यांनी दिली. या फिर्यादी त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या घरातील सर्व लोक करोनाबाधित असल्याने जास्त गर्दी करू नका, असे आपल्या भाच्याने काही युवकांना सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी हातामध्ये काठी घेऊन आपणास व आपल्या भाच्यांना मारहाण केली. या हाणामारीत परिगा सूर्यवंशी जखमी झाल्या.

पोलिसांनी योगेश मनोहर सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी, विनोद मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी योगेश सूर्यवंशी, शोभा मनोहर सूर्यवंशी, अरुणा मनोहर सूर्यवंशी व मनोहर बाबुराव सूर्यवंशी सर्व राहणार अकोले नाका यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 225/2021 भारतीय दंड संहिता कलम 143, 144, 147, 148, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खाडे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com