संगमनेरात 'या' कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

संगमनेरात 'या' कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

वाढदिवस (Birthday) आरडाओरड करुन साजरा होत असल्याच्या कारणावरुन दोन गटात (Two Group) शाब्दीक बाचाबाची होवून तुंबळ हाणामारी (Fight) झाली. या मारहाणीत (Beating) दोन्ही गटातील प्रत्येकी तीन असे सहा जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास इस्लामपुरा नाटकी चौक येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून (City Police) समजलेली माहिती अशी की, इस्लामपुरा नाटकी चौक (Islampura Natki Chowk) येथे वाढदिवस (Birthday) साजरा करण्यात येत होता. त्यावेळी मोठमोठ्याने आरडाओरड करुन हा वाढदिवस साजरा होत असतांना अमजद दाऊद सय्यद (वय 41) हे व त्यांचा मुलगा सोहेल व नातेवाईक हे समजावून सांगण्यात गेले असता तेथे जमीर शेख ऊर्फ पिंट्या अजिज शेख, फैजान समीर शेख, अदनान समी शेख, निसार शेख, मुन्ना शेख, गुड्डु निसार सेख, असिम शेख, अरबाज शेख, तस्लिम शेख, बत्रु शेख यांनी हातात लोखंडी रॉड हॉकीस्टीक, लाकडी दांडे घेवून अमजद दाऊद सय्यद व त्यांचा मुलगा सोहेल व इतर नातेवाईकांना बेदम मारहाण (Beating) केली. तर अमजद सय्यद यांचा भाऊ एजाज सय्यद याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न (Killed try) केला. व इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करत दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत अमजद दाऊद सय्यद, इब्राम दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, सोहेल अमजद सय्यद हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अमजद दाऊद सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 11 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 342/2021 भारतीय दंड संहिता 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. तर पाच जणांना ताब्यात (Arrested) घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. माळी (Sub-Inspector Mali) हे करत आहे.

तर परस्पर विरोधी फिर्यादीमध्ये शहेराज निसार शेख, अरबाज निसार शेख, अदनान समिर शेख, फैजान समिर शेख हे लोकसेवा गॅरेज समोर वाढदिवसानिमित्त केक कापत असतांना साहिल अमजद सय्यद, मजाज दाऊद सय्यद, अमजद दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, बब्बु दाऊद सय्यद, समीर अन्सार सय्यद, इरफान दाऊद सय्यद, परविन अमजद सय्यद, रुक्तार मजाज सय्यद (सर्व रा. इस्लामपुरा, संगमनेर) यांनी सदर ठिकाणी येवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण (beating) केली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने धारधार हत्याराने व फळीने मारहाण केली. यामध्ये शहेराज निसार शेख, अरबाज निसार शेख, अदनान समीर शेख हे जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील 1 ते 5 आरोपी हे रुग्णालयात उपचार (accused was treated at the hospital) घेत असून 6 ते 9 हे फरार झाले आहेत.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात वरील 9 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 343/2021 भारतीय दंड संहिता कलम 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख (Pi Mukund Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com