संगमनेरात तीन दिवसांत 32 रुग्ण
सार्वमत

संगमनेरात तीन दिवसांत 32 रुग्ण

आत्तापर्यंत 669 व्यक्ती झाल्या करोनामुक्त

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्या सुरू केल्यामुळे करोना बाधित आढळण्याची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत 32 करोना बाधित आढळून आले आहेत. तर तालुक्याची संख्या 848 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

महसूल व आरोग्य विभागाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या आहेत. नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सातत्याने प्रबोधन केले जात आहे. असे असले तरी नागरिकांनी देखील करोनाबाबत गांभीर्याने घेऊन आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याची गरज आहे.

सोमवारी स्थानिक प्रशासनास प्राप्त झालेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार सावरगावतळ येथील 22 वर्षीय तरुण, खासगी लॅब अहवालानुसार निमोण येथील 25 वर्षीय तरुण, मंगळवारी भरीतकर मळा 61 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 63 वर्षीय पुरुष, देवीगल्ली येथील 55 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 24 वर्षीय तरुण, कौठे बुद्रूक येथील 42 वर्षीय पुरुष, खराडी येथील 28 वर्षीय तरुण, अ‍ॅन्टीजेन चाचणीनुसार घुलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष (आश्वीच्या दोन व्यक्ती राहता तालुक्यातील रहिवाशी आहेत), अभिनवनगर येथील 68 वर्षीय महिला, जांबुत खुर्द येथील 62 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण,

निमोण येथील 54 वर्षीय पुुरुष, 48 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, निमोण येथील 30 वर्षीय पुरुष, खासगी लॅब अहवालानुसार ऑरेंज कॉर्नर येथील 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 23 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला तर बुधवारी आलेल्या खासगी लॅब अहवालानुसार कासारादुमाला येथील 36 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 33 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथील 46 वर्षीय पुरुष, घासबाजार येथील 54 वर्षीय पुरुष,

गांधीचौक येथील 42 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालयातील अहवालानुसार निमोण येथील 42 वर्षीय पुरुष याप्रमाणे करोना बाधित अहवाल प्राप्त झाले आहेत.सध्या 160 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 669 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com