थोरात कारखान्याच्यावतीने अद्यावत कोविड सेंटर सुरु
सार्वमत

थोरात कारखान्याच्यावतीने अद्यावत कोविड सेंटर सुरु

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर Sangmner तालुका व शहरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत असून तपासणी झालेल्या नागरिकांना चांगल्या व तातडीने सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वसंत लॉन्स येथे 300 बेडसह अद्यावत कोव्हिड सेंटर Covid Center सुरु करण्यात आले आहे.

वसंत लॉन्स येथे 300 अद्यावत बेडचे कोव्हिड कोअर सेंटरची पाहणी काँग्रेसचे Congress प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी केली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, संचालक रोहीदास पवार, दादासाहेब कुटे, गोरख कुटे, प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदि उपस्थित होते.

संगमनेर शहर व तालुक्यात शासकीय व खाजगी तपासणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एक रुग्णाबरोबर वीस इतर नागरिकांचे स्वॅब तपासली जात आहे. त्यामुळे संशयीत व सौम्य लक्षणे असणारे नागरिकांची संख्या वाढत आहेत. या नागरिकांची संस्थात्मक विलीगीकरणात चांगली व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाच्या मदतीला ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने पुढाकार घेतला असून यातून विविध सहकारी संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी कोव्हिड सेंटर करण्याचे नियोजन केले आहे.

तर युवक काँग्रेस व एनएसयुआय, जयहिंद युवा मंच व राजवर्धन फाऊंडेशनकडून जेवणाचे डबे पुरविले जात आहे. वसंत लॉन्स येथे कारखान्याच्या वतीने 300 सुसज बेड, फॅन, गादी, बेडशिट, जेवणाची व्यवस्था, स्वच्छ जागा, औषधौपचाराच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये 200 बेड हे पुरुषांसाठी तर स्वतंत्र कक्षात महिलांसाठी 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहे.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले, करोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होतो आहे. हे चिंताजनक आहे. परंतू प्रत्येकाने शासनाचे नियम पाळले तर करोना आपण रोखू शकतो.तालुक्यातील संकटाच्या वेळी अमृत उद्योग समूह कायम मदतीसाठी उभा राहिला असून कारखान्याच्यावतीने केलेली प्रशस्त 300 बेडची अद्यावत सुविधा अत्यंत चांगली आहे.

आ. डॉ. तांबे म्हणाले, नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरातील प्रशासन नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी कटिबध्द असून कारखान्याने सुरु केलेले हे सेंटर कौतुकास्पद असल्याचे ही ते म्हणाले.

बाबा ओहोळ म्हणाले, तालुक्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळात कारखाना कायम नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहिला आहे. वसंत लॉन्स येथील हे कोव्हिड सेंटर कार्यान्वित करुन आपला सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलला स्वतंत्र अतिदक्षता विभाग

सध्या घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय येथे सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांवर उपचार चालू आहे. यातील अतिगंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात येत होते .परंतु नगर मधील व्यवस्थेवर ताण वाढत असल्याने आता संगमनेर तालुक्यातील अतिगंभीर रुग्णांसाठी एस.एम.बी.टी. हॉस्पिटल, धामणगाव येथे व्हेंटीलेटरची सुविधा असलेले स्वतंत्र कोविड अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com