संगमनेरातील 16 लाखांची साखर चोरी करून परस्पर विकली

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेरातील 16 लाखांची साखर चोरी करून परस्पर विकली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर मधून खरेदी केलेली 16 लाख 66 हजार रुपयांची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी न पोहोचवता या साखरेची चोरी करून दुसर्‍याच व्यापार्‍याला विकण्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण येथील मंजुश्री करवा यांनी संगमनेरमधून साखर खरेदी केली होती.ही साखर प्रकाशचंद ओसवाल या व्यापार्‍याला पाठविण्यास सांगण्यात आले होते. मात्र ट्रक चालकांनी ही साखर इतर व्यापार्‍यांना विकली. साखर न मिळाल्याने संबंधित व्यापार्‍याने चौकशी केली.आपल्याला साखर मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले ्.यानंतर त्यांनी संबंधित ट्रकचालकांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत करवा यांना फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली.

आपण खरेदी केलेल्या साखरेचा अपहार करून ती परस्पर विकल्याचे करवा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन गाठले .मंजुश्री करवा यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोज गोकुळदास मानधने राहणार एरोडळ, जिल्हा जळगाव. वाहन क्रमांक एमएच18 बीए 5787 यावरील चालक, वाहन क्रमांक एमएच 09 एचएच2462 यावरील चालक अशा तिघांविरुद्ध गु्.र.न.368/ 2021 भा.दं.वि .कलम 406,420,507 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहे. या साखर चोरीमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. साखर चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com