
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner
महिला ग्रामसेवकाची (Women Gramsevak) गाडी अडवून या तलाठ्याकडील कागदपत्रांची पिशवी फेकून उपसरपंचाने असभ्य वर्तणूक (Rude behavior) केल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द (Sangmner Khurd) परिसरात घडली.
फिर्यादी महिला संगमनेर खुर्द येथे तलाठी (Talathi) म्हणून कार्यरत आहे. त्या काल कार्यालयातील काम आटोपून आपल्या अॅक्टिवा क्रमांक एम एच 17 बी एच 2978 या दुचाकीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाकडे (Tahasil Office) वाळू संदर्भातील अहवाल (Report) देण्यासाठी जात होत्या. संगमनेर खुर्द येथील मारुती मंदिराजवळ आल्या असता समोर उभा असलेला उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याने या कामगार तलाठी महिलेस आवाज देऊन थांबविले. माझ्या वारसनोंदी चे काम का होत नाही असे त्यांनी यावेळी विचारले. त्यावर माझ्याकडून एक काम झाले असून मंडलाधिकार्यांकडे कागदपत्रे पाठविली आहे.
ठराव मंजूर झाल्यावर फेरफार देते असे त्यांनी सांगितले. आपली दुचाकी चालू करून त्या निघाल्या असता उपसरपंचाने त्यांच्या गाडीची चावी काढली. कागदपत्रे फेकून दिली. तुम्ही फार इगो मध्ये आहे. तोंडाचा मास्क काढा, तुमचा फोटो काढतो असे म्हणून गणेश शिंदे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच अश्लील शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले. याबाबत पीडित महिला तलाठी यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून रात्री उशिरा शहर पोलिसांनी उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 354,504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.