संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव वाहतूक शाखा बरखास्त

पोलीस अधीक्षक पाटील यांचे आदेश : कर्मचार्‍यांची स्थानिक पोलीस ठाण्यात नियुक्ती
संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव वाहतूक शाखा बरखास्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील संगमनेर (Sangmner), श्रीरामपूर (Shrirampur), शेवगाव (Shevgav) याठिकाणी कार्यरत असलेली जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त (District Transport Branch dismissed) करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश (Order) त्यांनी काढले असून जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना संगमनेर शहर, श्रीरामपूर शहर, शेवगाव, पाथर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती (Appointment at Pathardi Police Station) देण्यात आली आहे. यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्याला 18 कर्मचारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला एक अधिकारी व 12 कर्मचारी तर शेवगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याला प्रत्येकी पाच कर्मचारी मिळाले आहे. यामुळे तेथील कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण हलका होण्यास मदत होणार आहे.

तात्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा (Superintendent of Police Ranjan Kumar Sharma) यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर व शेवगाव येथील वाहतुकीचा विचार करता तेथे जिल्हा वाहतूक नावाने स्वतंत्र शाखा सुरू केेल्या होत्या. जिल्ह्यातील जाणार्‍या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करणे, अपघातस्थळी मदत करणे आदी कामे या शाखेवर होते. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची कमतरता असताना जिल्हा वाहतूक शाखेत नियुक्त कर्मचार्‍यांकडून अपेक्षीत काम होत नसल्याने ही शाखा बंद करण्याचा निर्णय अधीक्षक पाटील यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वाहतूक शाखेमध्ये बहुतेक करून कर्मचार्‍यांची नियुक्ती होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी नसल्याने या शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत.

महामार्गावर होणार्‍या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यरत असते. याशिवाय जिल्हा पोलिसांकडून जिल्हा वाहतूक शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु, पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची कमतरता लक्षात घेता या शाखा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांना स्थानिक पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना वाहतूक ड्युटी देण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. इतरवेळी त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात इतर कामकाज करून घ्यावे, तसेच एकाच वेळी कर्मचार्‍याला जास्त वेळ वाहतूक ड्युटी करता नेमण्यात येऊ नये, असे आदेश अधीक्षक पाटील यांनी दिले आहे.

संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव वाहतूक शाखा बरखास्त केल्या आहेत. या शाखेमध्ये फक्त पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण नव्हते. तसेच या कर्मचार्‍यांचा उपयोग स्थानिक पोलीस ठाण्यात होणार असल्याने या शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत.

- मनोज पाटील (पोलीस अधीक्षक)

चालक अंमलदार ‘एमटी’कडे वर्ग

या तिन्ही शाखेकडे असलेले वाहन मोटार परिवहन विभागाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून चालक पोलीस अंमलदार यांना मोटार परिवहन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच लेखन सामुग्री, बॅरिकेट्स व इतर साहित्य संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com