संगमनेरात तिघा वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरात तिघा वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर|शहर प्रतिनिधी| Sangmner

वाळूची बेकायदेशीररित्या वाळूची चोरून वाहतूक करताना आढळल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे येथे पोलिसांनी ही कारवाई करत एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली व बुलेट जप्त केली आहे.

संगमनेर तालुक्यात वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे वाळूतस्कर मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे शिवारात वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना समजली.

पोलिस पथकाने वेल्हाळे येथे जाऊन पाहणी केली असता एका ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून चौकशी केली असता या ट्रॅक्टर ट्रॉलीत 4 हजार रुपयांंची 1 ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व बुलेट असा एकूण 4 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला.

याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कैलास राजाराम कासार (वय 41), संदीप सखाहरी गुळवे (वय 27), दीपक बाळासाहेब शिरतार (वय24) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास पोलीस श्री. बोटे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com