संगमनेरात वाळू तस्करांवर कारवाई
सार्वमत

संगमनेरात वाळू तस्करांवर कारवाई

4 वाहने जप्त; चौघांविरुध्द गुन्हा

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

बेकायदेशीररित्या प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करणार्‍यांवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चौघाजणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार वाहने जप्त करण्यात आली आहे.

प्रवरा नदीपात्रालगत शहरातील गंगामाई घाटाजवळ नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावून धडक कारवाई केली. या कारवाईत शिवाजी शरद काळण (रा. लालतारा कॉलनी, अकोेले नाका) याच्या ताब्यातील 50 हजार रुपये किंमतीची जुनी वापरती रिक्षा व 2 हजार रुपये किंमतीची वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कतार गल्लीतील एक युवक याच्या ताब्यातील रिक्षा व दोेन हजार रुपयांची वाळू जप्त केली आहे.

एम. एच. 15 जे. 103 ही जुनी वापरती रिक्षा व 2 हजार रुपयांची वाळू तसेच भाऊ आव्हाड (रा. संगमनेर खुर्द) याच्या ताब्यातील एम. एम. 17 ई. 80 या क्रमांकाचे वाहन 2 हजार रुपयांच्या वाळूसह जप्त केले आहे. तर भागवत बर्डे (रा. कासरवाडी) याच्या ताब्यातील एम. एम. 15 बी. 2305 हे वाहन व 2 हजार रुपये किंमतीची वाळू असा 2 लाख रुपयांची वाहने व 8 हजार रुपयांची वाळू एकूण मुदेमाल पोेलिसांनी जप्त केला आहेे.

वाळू तस्करीची माहिती समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी गंगामाई घाट येथे जात सदर वाहने ताब्यात घेण्याचे पोेलिस पथकाला सांगितले.

या वाळू तस्करांविरुध्द पोेलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, पोेलीस कॉन्स्टेबल साईनाथ तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी फिर्यादी दिल्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार खंडीझोड, पोलीस नाईक बोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भुतांबरे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com