34 पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह
सार्वमत

संगमनेरच्या कारागृहातील 22 कैद्यांची चाचणीही पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. काल संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातील कैद्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीत 22 कैदी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या कारागृहातील 46 कैद्यांची तपासणी करण्यात आली. कारागृहातील चार बराकीपैकी तीन बराकीमध्ये असलेल्या 22 कैद्यांना करोनाचे संक्रमण झाले आहे. काल दिवसभर वैद्यकीय पथकाने या कैद्यांची चाचणी केली. या तपासणीतून कैद्यांनाही करोनाची बाधा झाली असल्याचे पुढे आले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहात राहुरी, आश्वी येथील कैदी ठेवण्यात आले होते. त्यामुळे या कैद्यांची चाचणी न करताच त्यांना कारागृहात ठेवल्यामुळे सर्वच कैद्यांना करोनाची बाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. 22 पैकी 2 आरोपींना काल जामीन मंजुर झाला होता. मात्र त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सोडता येणार नाही. त्यामुळे त्यांची सिद्धकला हॉस्पिटलमध्ये रवानगी केली आहे. तर उर्वरीत 20 कैद्यांना संगमनेर नगरपालिकेच्या क्रिडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

काल सकाळपासूनच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कैद्यांची तपासणी सुरु होती. सायंकाळी 22 जणांचे करोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील काल समनापूर 37 वर्षीय पुरुष, पदमानगर येथील 50 वर्षीय पुरुष, खराडी येथील 40 वर्षीय पुरुष, साईबन कॉलनीतील 21 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, राजापूर येथील 75 वर्षीय पुरुष, एकता नगर येथील 52 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, घारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 18 वर्षीय तरुण, 28 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष,

आश्वी बुद्रूक येथील 33 वर्षीय पुरुष, वरवंडी येथील 35 वर्षीय तरुण, संगमनेर बुद्रूक येथील 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, माताडे मळा येथील 44 वर्षीय पुरुष, निमगावपागा येथील 40 वषीर्य पुरुष, पिंपळगाव देपा येथील 45 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, निळवंडे येथील 32 वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथील 35 वर्षीय पुरुष, वडगावपान येथील 59 वर्षीय पुरुष असे अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत. तर तीन अहवाल तालुक्याबाहेरी प्राप्त झाले आहे. काल 30 करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तालुक्याची करोना बाधीताचीं संख्या एकूण 684 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com