करोना
करोना
सार्वमत

संगमनेरात 8 पोलीस कर्मचार्‍यांसह नव्याने 51 करोना बाधीत

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात शुक्रवारी रात्री उशीरा 30 व्यक्तींचे करोना बाधीत अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 8 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर काल शनिवारी 21 व्यक्तींचे अहवाल करोना बाधीत आढळून आले. तालुक्याची एकूण संख्या 779 झाली असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अकोले नाका येथील 53 वर्षीय पुरुष, अकोले रोड येथील 38 वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथील 61 वर्षीय महिला, जमजम कॉलनी येथील 17 वर्षीय मुलगा, 13 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी अहवालानुसार कनोली येथील 30 वर्षीय महिला, मालदाड रोड येथील 35 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 43 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 30 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, घास बाजार येथील 75 वर्षीय पुरुष, आंबीखालसा येथील 12 वर्षीय मुलगी, 16 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 42 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 27 वर्षीय पुरुष, पोलीस कर्मचार्‍यांमध्ये घुलेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 45 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 33 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या खासगी लॅब अहवालानुसार घासबाजार येथील 77 वर्षीय महिला, 51 वर्षीय महिला, सुकेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 81 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, रॅपिड अ‍ॅन्टीजेन लॅबनुसार घुलेवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 29 वर्षीय महिला, पोलीस कॉलनी येथील 23 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 27 वर्षीय महिला, घासबाजार येथील 72 वर्षीय पुरष, 68 वर्षीय महिला, संजय गांधी नगर येथील 32 वर्षीय पुरुष, लालतारा हौसिंग येथील 21 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुणी, खांबा येथील 55 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 79 वर्षीय पुरुष, विजयनगर येथील 60 वर्षीय महिला, खराडी येथील 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तालुक्यात एकूण करोना बाधीत 779 असून 527 रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर 233 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शनिवारी संगमनेर कॉटेज हॉस्पिटलमधून 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com