संगमनेरात चार पोलिसांसह 26 करोनाबाधीत

संगमनेरात चार पोलिसांसह 26 करोनाबाधीत

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात करोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल नव्याने 26 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 4 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधीतांची संख्या 728 झाली आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातील 22 कैदी करोनाबाधीत आढळल्याने सर्वच पोलीस कर्मचार्‍यांची आरोग्य पथकाने तपासणी केली. अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्हा रुग्णालयाकडून सात अहवाल प्राप्त झाले तर दोन अहवाल खाजगी लॅबचे आहेत तर रॅपीड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार 18 व्यक्तींचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. रॅपीड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार आंबी खालसा येथील 43 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 42 वर्षीय पुरुष, संगमनेरातील रंगारगल्ली येथील 62 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा, 5 महिन्याची बालिका, 6 महिन्याची मुलगी, 27 वर्षीय तरुण, माळीवाडा येथील 32 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथील 30 वर्षीय महिला, पदमानगर येथील 45 वर्षीय पुरुष, कनोली येथील 54 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, तर पोलीस कर्मचार्‍यांच्या तपासणीमधील जनतानगर येथील 31 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनीतील 26 वर्षीय महिला, जनतानगर येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

तर जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये देवाचा मळा येथील 30 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 7 वर्षीय मुलगी, आश्वी बुद्रूक येथील 27 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 9 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, तर खाजगी लॅबमधील अहवालानुसार चिकणी येथील 28 वर्षीय पुरुष, महात्मा फुले नगर येथील 29 वर्षीय पुरुष.

तसेच 29 जुलै रोजी रॅपीड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पोखरी हवेली येथील चार व्यक्ती पॉझिटीव्ह दर्शविण्यात आल्या होत्या. मात्र त्या पोखरी हवेली येथील नसून पोखरी बाळेश्वर येथील असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com