निमगाव भोजापूर येथील मुन्नाभाईच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांचा छापा

निमगाव भोजापूर येथील मुन्नाभाईच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांचा छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील निमगाव भोजापूर येथे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर प्रांताधिकार्‍यांनी छापा टाकला. त्याची चौकशी सुरू होताच या मुन्नाभाईने पलायन केले. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथे शैलेश किसन कडलग हा वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेही कागदपत्र नसताना रुग्णांची सेवा करीत होता. तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव असताना त्याची सेवा जोरदार सुरु होती. याबाबत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास निमगाव भोजापूर येथे जाऊन त्याची माहिती घेतली. गावठाणा मध्ये त्याचा वैद्यकीय व्यवसाय जोरात सुरू होता. प्रांताधिकार्‍यांनी त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणार्‍या कागदपत्रांची मागणी केली मात्र तो सदर कागदपत्रे देऊ शकला नाही आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच त्याने घटनास्थळावरून पलायन केले.

यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दवाखान्याची झडती घेतली. या झडतीमध्ये आढळलेले सर्व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शैलेश कडलग याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 163/2021 महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनीयम 1961 कलम 33 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेेड कॉन्स्टेबल एस. एस. पाटोळे हे करीत आहे. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अधिकारक्षेत्रात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट प्रांताधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यामुळे उघड झाला आहे.

2007 सालच्या गॉगल डॉक्टरच्या यादीमधील आहे त्याला यापूर्वीही बोगस डॉक्टर ठरविण्यात आले होते असे असतानाही त्याचा वैद्यकीय व्यवसाय जोमात सुरू होता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांचे तालुक्यातील बोगस डॉक्टरांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असतांना शैलेश कडलग हा बोगस डॉक्टरांची यादीत असतानाही त्याचा वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील बोगस डॉक्टरांना कोणाचा आशीर्वाद आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com