संगमनेर नगरपालिकेसमोर खड्ड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलन

संगमनेर नगरपालिकेसमोर खड्ड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर (Sangmner) शहरातील विविध रस्त्यांमधील खड्ड्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष (Municipal neglect) झाले आहे. नागरीकांना रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागते. या प्रश्नी पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने (BJP) नगरपालिकेसमोर व रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.

शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळीकडेच खड्डेमय रस्ते (pits roads) आहेत. वाहन चालकांना हे खड्डे वाचवत आपली वाहन चालवणे म्हणजे जणू एक कसरतच करावी लागत आहे. हे खड्डे वाचविण्याच्या नादात वाहने एकमेकाला आदळून दुर्घटना होत आहेत. भर रस्त्यांमध्ये मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. तर नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या गल्लीत राहत्या परिसरात मात्र चकाचक, स्वच्छ, सुंदर रस्ते आहेत.

संगमनेर नगर पालिकेच्या (Sangamner Municipality) अधिकार्‍यांचे व नगरसेवकांचे लक्ष नाही का? असे सवाल संगमनेर शहरातील व ग्रामीण भागातील ये जा करणार्‍या जनतेच्या मनात उठत आहेत. प्रत्येक वाहन चालक तत्परतेने वाहन नेऊ पाहतो आणि लगेच समोर एका मोठ्या खड्ड्यात आपली गाडी जाते आहे असे जाणून गाडी डावी किंवा उजवीकडे घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे छोटे मोठे अपघात दररोजच होत आहेत. याप्रश्नी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले (Shriram Ganpule) यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

15 दिवसांचा एक कालबध्द कार्यक्रम आखून हे खड्डे त्वरीत बुजविण्यात यावेत. जी खड्डे अत्यंत धोक्याची वाटतात ती दोन दिवसांत भरून रस्ते रहदारीसाठी सुरळीत ठेवण्यात यावेत. रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा (Movement Hint) भाजपकडून देण्यात (BJP) आला आहे. यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व रस्त्यावरील खड्ड्यात विलायती बाभळी (वेड्या बाभळी) चे वृक्षारोपण करून प्रतिकात्मक आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध (Protest of municipal administration)केला आहे.

यावेळी किशोर गुप्ता, जावेद जहागीरदार, शाम कोळपकर, सुनील खरे, मुकुंद उपरे, राहुल भोईर, बागुल ताई, सखाहरी जाधव, शिरिष मुळे, दिपक भगत, रोहित चौधरी, नितीन म्हस्के, संजय नाकिल, ऋषिकेश मुळे, वैभव लांडगे, सिताराम मोहरीकर, सुधीर कुलकर्णी, अतुल कासट, संतोष पठाडे, नवनाथ वावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com