डासांच्या साम्राज्यामुळे संगमनेरकरांचे आरोग्य धोक्यात

औषध फवारणी बिनकामी
डासांच्या साम्राज्यामुळे संगमनेरकरांचे आरोग्य धोक्यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर (Sangmner) व परिसरात डासांचे साम्राज्य (mosquitoes grew) वाढले आहे. यामुळे संगमनेरकरांचे आरोग्य धोक्यात (Health is at Stake) आले आहे. डासांना नष्ट करण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे केली जाणारी औषध फवारणी बिनकामी (Drug spraying useless) असल्याचे स्पष्ट झाले आहे. फवारणीमध्ये औषध कमी व पाणी जास्त वापरले जात असल्याने डासांचे साम्राज्य शहरात कायम आहे. संगमनेर शहरात दोन वर्षापासून करोनामुळे अनेकांचा बळी गेला.

करोनाचे सावट (corona) कमी झाले असताना डासांचा त्रास सुरू झाला आहे. डासांच्या त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात (Endangering the health of citizens) आले आहे. अनेक ठिकाणी तापाचे पेशंट वाढत चालले आहे. नगरपालिका प्रशासनाला (municipal administration) याची कल्पना असतानाही पालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. गेल्या दोन दिवसापासून शहरामध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषधांची फवारणी केली जात आहे मात्र औषध फवारणी करून ही स्थिती ‘जैसे -थे’ आहे. या फवारणी मध्ये औषधापेक्षा पाणी जास्त वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने औषधाचे प्रमाण योग्य पद्धतीने वापरावे तरच शहरातील डासांची संख्या कमी होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. संगमनेर बसस्थानकाची स्वच्छता राखली जात नसल्याने तेथेही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोनाच्या नावाखाली टिमक्या वाजवत फिरणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना संगमनेरात डासांनी उच्छाद मांडल्याचे दिसत नाही का? असा सवाल नागरिकांमधून आता विचारला जात आहे. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून शहरातील डासांचा प्रादुर्भाव कमी होईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com