संगमनेरात आंदोलनप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात आंदोलनप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील निंबाळे बाह्यवळण समनापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी दूध प्रश्नी आंदोलन केले. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दूध भाव व अनुदान प्रश्नी भाजप, दूध उत्पादकांनी शनिवारी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील निंबाळे बाह्यवळण समनापूर येथे आंदोलन केले. मा. जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या जमावबंदी आदेशाचे आंदोलनकर्त्यांनी उल्लघंन केले.

तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन उपद्रव करून हयगयीने व मानवी जीवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य व संसर्ग पसरवण्याची हयगयीची व घातक कृती करून शासनाच्या विविध आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदार बाळासाहेब मधुकर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संतोष मधुकर रोहोम, दीपक वसंतराव भगत, श्रीराज भाऊसाहेब डेरे, राजेश माधवराव चौधरी, योगराज सिंग कुंदन सिंग परदेशी, राहुल संपत दिघे, सोपान कोंडाजी तांबडे, संपत रामनाथ अरगडे, परिमल धनंजय देशपांडे, संजय चंद्रकांत नाकील, कैलास राजाराम कासार, नवनाथ बाबुराव दिघे, संपत नाना राक्षे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1190/2020 भारतीय दंड संहिता 269, 188, महा.को 19 वि 2020 चे कलम 11, महा. पो. अधि. क 37,1/3 चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल केला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

Related Stories

No stories found.