ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात घरोघर तपासणी अभियान

ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात घरोघर तपासणी अभियान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील करोना रुग्ण वाढ थांबवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी, गावातील कार्यकर्ता यांना सूचना केल्या असून आपल्या विभागातील प्रत्येक घरोघर जाऊन काही लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्याकरता सूचना दिल्या असून यानुसार पदाधिकारी व शासकीय कर्मचारी एकत्रितपणे गावोगाव तपासणी अभियान राबवत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.

या अभियानाबाबत अधिक माहिती देताना डॉ. मंगरूळे म्हणाले की, तालुक्यातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासन व सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विशेष सूचना दिले आहेत. यामध्ये संगमनेर शहरात नगरसेवकांनी व त्या विभागात नेमून दिलेल्या शासकीय कर्मचार्‍यांनी घरोघर जाऊन तपासणी करायची आहे.

तर संगमनेर तालुका मोठा असल्याने प्रत्येक गावातील पदाधिकार्‍यांनी आपल्या वार्डमधील कुटुंबातील व्यक्तींच्या तपासणी करता नेमून दिलेले शासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने करोना रुग्ण व काही लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या वर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कामाकरता संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात 988 टीम कार्यरत केले असून यामध्ये शासकीय सर्व विभागाचे कर्मचारी. तसेच स्थानिक शिक्षक सुद्धा सामील करण्यात आले आहे, यामुळे करोना रुग्ण वाढीला अटकाव करण्यास सोपे होणार आहे.

या टीमचे सदस्य प्रत्येक घरोघर जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहेत. तसेच त्याला ताप किंवा इतर काही लक्षणे आढळली तर तातडीने वेगळे करून त्यावर उपचार करण्यासाठी त्यास संस्थात्मक विलिगीकरणात पाठवत आहेत.

तरीही प्रशासनाच्या या कामा बरोबर नागरिकांची स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. तसेच कोणत्याही कुटुंबात कोणत्याही व्यक्तीला ताप किंवा इतर कोणतेही लक्षण आढळल्यास तरी तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा.

हे अभियान संगमनेर शहरात राबविल्याने शहरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता तालुक्यांमध्ये हे तपासणी अभियान राबवले जात आहे. तालुक्यात विविध हॉस्पिटल मध्ये करोना रूग्णांवर उपचार केला जात असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने उभारले 500 बेडचे कोवीड केअर सेंटर व इतर सेवाभावी संस्थांची ही कोवीड केअर सेंटर कार्यरत आहे.

त्यामुळे कोणाला काही लक्षणे आढळली तर तातडीने त्यामध्ये संपर्क साधावा असे आवाहन डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम त्यांनी केले आहे.

होम क्वारंटाईन बंद

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार करोनाची काही लक्षणे आढळल्याची होम क्वारंटाईन तातडीने बंद करण्यात आले असून त्या सर्वांना संस्थात्मक विलीनीकरण करण्यात येत आहे. यामुळे करोना लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींची तपासणी व त्यावर ट्रीटमेंट करणे सोपे होत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com