संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण करून राडा केल्याची घटना काल रात्री उशिरा संजीवनी हॉस्पिटल मध्ये घडली.

यावेळी एका वाहणाचीही तोडफोड करण्यात आली. याबाबत समजलेली माहिती अशी की संगमनेर महाविद्यालयाजवळ असणाऱ्या संजीवन हॉस्पिटलमध्ये काल हसनापूर येथील एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना अचानक तो मयत झाला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी हुज्जत घातली एकाने ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केली.

यावेळी मोठा जमाव एकत्र आला यातील काहींनी एक वाहनांची तोड फोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही पोहचले. यावेळी तणाव निर्माण झाला होता. यावेळी रुग्णालय अधिकारी विरुद्ध आरोप करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता.