संगमनेर |शहर प्रतिनिधी| sangmner

शहरातील परदेशपुरा परिसरात असणार्या सटूआईच्या मंदिरातील मुर्तीची विटंबना एका मद्यपीने केल्याची घटना

काल रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी भाविकांनी या मद्यपीला पकडून चांगलाच चोप दिला.

शहरातील परदेशपुरा परिसरात सटुआईचे मंदीर आहे. या मंदिरात भाविक नेहमीच देवदर्शन करण्यासाठी येत असतात. काल सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एक मद्यपी मंदिराजवळ आला. मंदिराजवळ कोणीच नसल्याने त्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मुर्तीला दगड मारून मुर्तीची तोडफोड केली. दिवाबत्ती करण्यासाठी भाविक मंदिरात आल्याचे पाहून त्याने पळण्याचा प्रयत्न केला. भाविकांचा आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले.

सदर मद्यपीला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर मद्यपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.