संगमनेरात 39 करोना बाधित
सार्वमत

संगमनेरात 39 करोना बाधित

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|sangmner

संगमनेर शहरासह तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसागणीक वाढतच आहेत. काल 39 करोना बाधित आढळून आले. तालुक्याची एकूण संख्या 1063 झाली आहे. तर 214 व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

खासगी लॅब अहवालानुसार लालतारा हाउसींग सोसायटी मधील 63 वर्षीय महिला, जोर्वे येथील 43 वर्षीय पुरुष, जनतानगर येथील 68 वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथील 49 वर्षीय महिला, कुरण येथील 51 वर्षीय पुरुष, स्वदेश हॉटेल मधील 43 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 58 वर्षीय महिला, बोटा येथील 69 वर्षीय पुरुष, रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीनुसार चंदनापुरी येथील 54 वर्षीय पुरुष, जनतानगर येथील 48 वर्षीय महिला,

विद्यानगर येथील 41 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 62 वर्षीय महिला, संगमनेरातील 52 वर्षीय पुरुष, वाडेकर गल्ली येथील 52 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 34 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, पिंपरणे येथील 70 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, ऋणानुबंध मंगल कार्यालय 45 वर्षीय पुरुष, पंपींग स्टेशन 72 वर्षीय महिला,

चिंचोलीगुरव येथील 44 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, साळीवाडा येथील 76 वर्षीय पुरुष, निमगावजाळी येथील 82 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येतील 48 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष, चिकणी येथील 48 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 86 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथील 40 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 58 वर्षीय पुरुष, स्वातंत्र्य चौकातील 48 वर्षीय पुरुष याप्रमाणे अहवाल प्राप्त झाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com