संगमनेरात दोन दिवसांत 56 करोना बाधित

corona
corona

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीतून गुरुवारी 40 तर शुक्रवारी 16 असे दोन दिवसांत एकूण 56 व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 926 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

गुरुवारी स्थानिक प्रशासनाकडून मालपाणी लॉन्स येथे 150 व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केली. त्यातून 32 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्याबरोबर खासगी लॅबकडून 8 व्यक्तींचे करोना बाधित अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामुळे काल तालुक्यात नव्याने 40 करोना बाधितांची भर पडली आहे. तर शुक्रवारी 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रहेमतनगर येथील 49 वर्षीय महिला, जाणता राजा मार्ग येथील 45 वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथील 58 वर्षीय पुरुष, आंबी खालसा येथील 42 वर्षीय पुरुष, श्रमिक नगर येथील 48 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 31 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीनुसार मालदाड रोड येथील 55 वर्षीय महिला, रंगारगल्ली येथील 14 वर्षीय युवक, 38 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण, चिखली येथील 45 वर्षीय पुरुष,

घुलेवाडी येथील 20 वर्षीय तरुण, 51 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, 23 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुण, नान्नज येथील 5 महिन्यांची बालिका, 65 वर्षीय पुरुष, वडगावपान येथील 29 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालिका, 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगा इंदिरा नगर येथील 65 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगा, पोखरी येथील 24 वर्षीय महिला, 1 वर्षीय बालिका, उपासणी गल्ली येथील 50 वर्षीय पुरुष यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

तर शुक्रवारी खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जोर्वे येथील 69 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 35 वर्षीय महिला, नान्नज येथील 63 वर्षीय पुरुष, रॅपिड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार घुलेवाडी येथील 26 वर्षीय महिला, कासारादुमाला येथील दीड वर्षांची मुलगी, जनतानगर येथील 41 वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथील 19 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 34 वर्षीय पुरुष, मालदाड येथील 26 वर्षीय पुरुष घुलेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, चिखली येथील 23 वर्षीय महिला, 54 वर्षीय महिला, श्रमिकनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कर्‍हे येथील 55 वर्षीय पुरुष याप्रमाणे अहवाल प्राप्त झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com