corona
corona
सार्वमत

संगमनेरात नव्याने 22 करोना बाधित

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहरासह तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काल 22 करोना बाधित आढळून आले. तालुक्याची एकूण संख्या 1024 झाली आहे. तर 204 व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सुकेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, संगमनेरातील वकील कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील 33 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथील 74 वर्षीय महिला तर रॅपिड अ‍ॅन्टीजेन अहवालानुसार पिंपरणे येथील 50 वर्षीय पुरुष, संगमनेरातील साळीवाडा येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, 35 वर्षीय पुरुष, वडगावपान येथील 55 वर्षीय पुरुष,

विद्यानगर येथील 52 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 26 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील 34 वर्षीय महिला, जनतानगर येथील 27 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, परदेशपुरा येथील 61 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, 9 वर्षीय मुलगी, 16 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, वेल्हाळे येथील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com