संगमनेरात 11 जणांना करोनाची बाधा
सार्वमत

संगमनेरात 11 जणांना करोनाची बाधा

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर तालुक्यात काल नव्याने 11 करोना बाधितांची भर पडली आहे. तालुक्याची एकूण संख्या 490 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

गुरुवारी शहरातील मोगलपुरा येथील 71 वर्षीय व्यक्तीची चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर सदर व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मयतांची संख्या 18 वर गेली आहे.

शुक्रवारी खंडोबा गल्ली येथील 78 वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली. तर काल शनिवारी शहरातील घोडेकर मळा येथील 27 वर्षीय तरुण, घासबाजार येथील 55 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 65 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, पदमानगर येथील 24 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 20 वर्षीय तरुणी, वडगावलांडगा येथील 36 वर्षीय महिला, संगमनेरातील देवीगल्ली येथील 18 वर्षीय तरुणी, बाजारपेठेतील 14 वर्षीय मुलगा असे एकूण 11 करोना बाधीत अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com