corona
corona
सार्वमत

संगमनेरात 30 करोना बाधित

घुलेवाडीच्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल नव्याने 30 करोनाबाधित रुग्ण आढळून आले तर नाशिक येथे उपचार घेत असलेल्या एका करोना संक्रमीताचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत एकूण 17 व्यक्ती मयत झाल्या आहेत, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीची अंमलबजावणी होत असल्याने करोनाबाधितांची संख्या पुढे येत आहे. आत्तापर्यंत 2850 स्वॅब घेण्यात आले आहे की, जे नगर जिल्ह्यात सर्वाधिक घेतलेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण 456 करोनाबाधित आढळले. पैकी 279 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर उपचार सुरू असलेल्यांची संख्या 160 आहे. तर एकूण मृत्यू 17 आहेत. मृत्युदर 3.72 टक्के आहे. करोनातून बरे झालेल्यांची टक्केवारी 61.18 आहे. शहराजवळील घुलेवाडी येथील एक 59 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळला होता. त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. दरम्यान काल सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

काल जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार संगमनेरातील नगररोड 50 वर्षीय पुरुष, मालदाड रोेड 30 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 16 वर्षीय तरुण, रायते 54 वर्षीय पुरुष, निमगावजाळी येथील 65 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 38 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, 20 वर्षीय तरुणी, 44 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथील 22 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय मुलगी,

1 वर्षीय मुलगा, शिबलापूर येथील 42 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, संगमनेरातील घासबाजार येथील 57 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, 55 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला याप्रमाणे 24 करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. तर खाजगी लॅबमधून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मंगळापूर येथील 71 वर्षीय पुरुष, कुरण येथील 37 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 40 वर्षीय महिला, संगमनेरातील भारतनगर येथील 54 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 30 वर्षीय पुरुष, राजापूर येथील 60 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच स्थानिक प्रशासनाने 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून तालुक्यातील गावांमध्ये संशयित व्यक्तींचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली. ‘3 टी’ फॉर्म्युला म्हणजेच ट्रॅकींग, टेस्टींग, ट्रीटमेंट होय. याअंतर्गत तालुक्यात आतापर्यंत 2850 स्वॅब घेण्यात आले आहे. की जे स्वॅब नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घेण्यात आले आहेत. आढळून आलेल्या रुग्णांवर होत असलेल्या उपचारांमुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 61.18 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com