संगमनेरात नव्याने 16 करोना बाधित

corona
corona

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यात करोनाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काल 16 करोना बाधितांची नव्याने भर पडली.

आत्तापर्यंत 1720 करोना बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

खासगी लॅबकडून प्राप्त अहवालानुसार मालदाड रोड येथील 39 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 17 वर्षीय तरुणी, गणेशनगर 45 वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार घुलेवाडी 21 वर्षीय तरुण, घुलेवाडी 52 वर्षीय पुरुष, अ‍ॅन्टीजेन टेस्ट अहवालानुसार घुलेवाडी येथील 50 वर्षीय महिला,

चिंचपूर येथील 65 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 13 वर्षीय मुलगा, चिकणी 46 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, बोटा 45 वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालय अहवालानुसार घोडेकर मळा येथील 37 वर्षीय पुरुष.

आत्तापर्यंत 1720 करोना बाधीत झाले आहे. तर 1405 करोना मुक्त झाले आहेत. तर 289 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com