corona
corona
सार्वमत

संगमनेरात नव्याने 30 करोना बाधित

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 30 करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याने बाधित रुग्णांचे बारावे शतकही पूर्ण केले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 1 हजार 212 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 1 हजार दोन रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत, तर केवळ 188 रुग्णांवर सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

काल प्राप्त झालेल्या 30 अहवालांपैकी पाच जणांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. कालच्या अहवालातून शहरातील आठ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यात रंगार गल्लीतील 62 वर्षीय इसम व तीस वर्षीय महिला, मोमीनपुरा येथील 44 वर्षीय व 76 वर्षीय महिला, कुंभारवाडा परिसरातील बारा वर्षीय बालक, गणेशनगरमधील 80 वर्षीय महिला व 45 वर्षीय तरुण, तर देवाचा मळा परिसरातून 39 वर्षीय तरुण आदींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

काल तालुक्यातही 22 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तीगाव येथील सतरा व दहा वर्षीय मुलींसह 13 वर्षीय बालकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. यासह चिंचोली गुरव येथील 67, 42 व 38 वर्षीय इसमांना तर पिंपरी लौकी येथील तीन वर्षीय चिमुरडीसह 29 आणि 60 वर्षीय महिलांना तसेच सतरा व अठरा वर्षीय तरुणांना संक्रमण झाले आहे.

चंदनापुरी येथील 69 व 55 वर्षीय पुरुषांनाही करोनाची लागण झाली आहे. हिवरगाव पावसा येथील 80 वर्षीय वृद्धाला, कनोली येथील 49 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, जवळेकडलग येथील 19 वर्षीय तरुणी, शहरालगतच्या घुलेवाडी येथील 40 व 27 वर्षीय तरुणांनाही करोनाची बाधा झाली आहे.

आत्तापर्यंत आढळून आलेल्या करोना बाधितांपैकी 1 हजार 2 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील केवळ 188 बाधितांवर शासकीय व खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com