Corona
Corona
सार्वमत

संगमनेरात दोन दिवसात 66 करोना बाधित

शासकीय कोव्हिड सेंटरमधून 51 रुग्ण करोनामुक्त

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर तालुक्यात शनिवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात 34 तर रविवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 25 तर रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टनुसार 7 करोनाबाधित अहवाल स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाले. तालुक्याची एकूण संख्या 560 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. तर काल रविवारी शासकीय चार कोव्हिड सेंटरमधून एकूण 51 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

शहरातील पदमानगर येथील 28 वर्षीय तरुण, 22 वर्षीय युवती, 3 वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला, बाजारपेठ येथील 36 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, जनतानगर येथील 45 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, जेधे कॉलनी येथील 52 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण तर 28 वर्षीय युवती, 1 वर्षाची बालिका, 6 वर्षीय मुलगी, कोष्टी गल्ली येथील 53 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 34 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष, बडोदा बँकेजवळील 33 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय युवती, राजापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कोंची येथील 22 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 15 वर्षीय मुलगा, सुकेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 23 वर्षीय युवती, गणेशनगरमध्ये 33 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालिका, कुरण येथील 45 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथील 72 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 45 वर्षीय महिला असे एकूण34 अहवाल प्राप्त झाले.

रविवारी रात्री 10 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूर येथील 21 वर्षीय तरुणी, जवळेकडलग येथील 27 वर्षीय महिला, संगमनेर येथील जोंधळे कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष, कुरणरोड येथील 52 वर्षीय पुरुष, रायते येथील 70 वर्षीय महिला, अशोकचौकातील 7 वर्षीय बालिका, संगमनेर येथील पदमानगर येथील 80 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 14 वर्षीय तरुण, 6 वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगा, दोन वर्षीय बालिका, 52 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, सुकेवाडी येथील 23 वर्षीय तरुण, धांदरफळ बुद्रुक येथील 26 वर्षीय पुरुष, उंबरीबाळापूर येथील 27 वर्षीय तरुण, निमोण येथील 42 वर्षीय पुरुष, वरुडीपठार येथील 50 वर्षीय पुरुष, संगमनेर शनीमंदिर परिसरातील 45 वर्षीय पुरुष, सावित्रीबाई फुलेनगर 44 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, कुरण रोड येथील 52 वर्षीय महिला यापैकी 18 सरकारी लॅब तर 7 खासगी लॅबचे अहवाल आहेत.

तर अ‍ॅन्टीजेन टेस्ट रिपोर्टनुसार 7 व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये दिल्लीनाका येथील 45 वर्षीय महिला, निमोण एथील 38 वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रूक येथील 62 वर्षीय पुरुष, जाणता राजा मार्ग येथील 60 वर्षीय पुरुष, ऑरेंज कॉर्नर येथील 78 वर्षीय महिला, 84 वर्षीय पुरुष, मेनरोड येथील 75 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तालुक्यातील निमोण येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधून काल 20 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नायब तहसीलदार सातपुते, सरपंच दगडू आप्पा घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदुरकर, ग्रामविकास अधिकारी मिसाळ उपस्थित होते.

शासकीय कोव्हिड सेंटर

- करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण घुलेवाडी- 30, संगमनेर खुर्द सिध्दकला हॉस्पिटल- 35, निमोण - 0, कुरण - 0

- कोव्हिड सेंटरमधून रविवारी करोनामुक्त झालेल्या व्यक्ती सेंटरनिहाय. घुलेवाडी - 5, संगमनेर खुर्द सिध्दकला हॉस्पिटल - 22, निमोण - 20, कुरण - 4

- आत्तापर्यंत 350 व्यक्ती करोना मुक्त झाल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com