संगमनेरः 113 करोनाबाधित

करोनाबाधित
करोनाबाधित

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला असून संगमनेर तालुक्यात दिवसागणिक करोनाचे रुग्ण वाढतच आहे.

काल नव्याने 113 रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत करोना बाधितांची संख्या 9 हजार 194 झाली आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी कालपासून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 या कालावधीत चालू असलेली दुकानेः- किराणा दुकाने, फळ दुकाने, भाजीपाला दुकाने, डेअरी, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने, बेकरी, स्वीट मार्ट, अन्नपदार्थांचे हातगाडे, धाबे, हॉटेल, रेस्टॉरंट, (फक्त पार्सल सेवेसाठी), मेडिकल, सर्जीकल, पॅथोलॉजी लॅब व वैद्यकीय सेवा, कृषी सेवा केंद्र, शेती पुरक व्यवसाय, मटन, चिकन अंडी (मांस विक्री तत्सम), अत्यावश्यक सेवेतील एलपीजी गॅस, पेट्रोल, डिझेल पंप या व्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना पुढील शासन आदेशापर्यंत बंद राहतील, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com