संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

केंद्र सरकारने विनाचर्चेने लादलेले जुलमी कृषी विधेयक व कामगार विधेयक हे अत्यंत जाचक असून हे तातडीने रद्द करावे

या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात तालुका काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला.

संगमनेर बसस्थानकासमोर नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे धरणे आंदोलन झाले. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जि. प. सभापती सौ. मीराताई शेटे, पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, संतोष हासे, हिरालाल पगडाल, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, सुभाष सांगळे, गणपतराव सांगळे, कैलासराव पानसरे, निर्मलाताई गुंजाळ, उबेद शेख उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, प्रा. बाबा खरात, माणिकराव यादव, आनंद वर्पे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, केंद्र सरकारने विना चर्चेने देशांमध्ये लागू केलेले कृषी व कामगार विधेयके अत्यंत जाचक व सर्वसामान्यांच्या विरोधी आहे. या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये तीव्र भूमिका घेतली असून देशभरातील शेतकर्यांमध्ये केंद्राने लादलेल्या या कायद्याविरोधात संतापाची लाट आहे.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भाजप सरकार हे शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधी सरकार आहे. मागील सहा वर्षांच्या जाहिरातबाजीशिवाय दुसरे काहीही केले नाही. कोणतेही विकासकाम नसणारे या सरकारने शेतकरी व कामगारांची गळचेपी करण्यासाठी नवे काळे कायदे आले आहेत. हे तातडीने रद्द करावेत म्हणून देशपातळीवर श्रीमती सोनिया गांधी व राज्य पातळीवर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. देशभरातून सह्यांचे निवेदनही राष्ट्रपती यांना देण्यात आले मात्र तरीही केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत आहे, हे अत्यंत निंदनीय आहे.

बाबा ओहोळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष कायम शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहिला असून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या कायद्याला तीव्र विरोध केला आहे. राज्यभरातून सह्यांची मोहीम राबवून श्रीमती सोनिया गांधी यांच्याहस्ते राष्ट्रपती महोदयांकडे सुपूर्द केली आहे.

यावेळी सौ. मिराताई शेटे, रामहरी कातोरे, शिवाजी जगताप, शेखर सोसे, माणिकराव यादव, हिरालाल पगडाल, भास्कर शेरमाळे, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, अरुण कान्होरे आदींनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी रमेश गुंजाळ, स्वाती मोरे, हैदर सय्यद, बाळासाहेब पवार, अॅड. त्र्यंबक गडाख, भाऊसाहेब शिंदे, तात्याराम कुटे, अॅड. आर. बी. सोनवणे, बी. आर. चकोर, दत्तू कोकणे, नवनाथ महाराज आंधळे, सोमनाथ सोनवणे, विलास कवडे, विलास वर्पे, शिवाजी खुळे, सौदामिनी कान्होरे आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले. केंद्र सरकार विरोधातील घोषणांनी नवीन नगर रोड परिसर दुमदुमून गेला.